आदिवासी समाजाच्या दोन गटातील वादावादीत चौघांची हत्या
सार्वमत

आदिवासी समाजाच्या दोन गटातील वादावादीत चौघांची हत्या

Arvind Arkhade

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा, सुरेगाव हद्दीत आदिवासी समाजाच्या ४ तरुणांचा मागील कारणातून झालेल्या भांडणातून खून होऊन यात नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे (वय २२), तर सूरेगाव येथील नातीक कुंजा चव्हाण (वय ४० वर्ष), नागेश कूंजा चव्हाण (वय १४ वर्ष), श्रीधर कूंजा चव्हाण (वय ३५) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत प्राथमिक माहिती मिळाली उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल झाला नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे जण विसापूर फाटा येथे गेले असता सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात मारामारी होऊन झालेल्या मारामारीत चौघे जण जागीच ठार झाले. मयत झाल्याची माहिती कुंजा चव्हाण यांच्या घरच्यांना माहीत झाल्यानंतर यातील तिघांना सुरेगाव येथील पालावर घेऊन आले तर लिंब्या हाब्र्या काळे याला विसापूर फाटा येथेच सोडून दिले. घटनेची माहिती संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोर्‍हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असल्याची प्राथमिक माहिती दिली.

आदिवासी समाजाच्या गटात झालेल्या मारामारीत सुरेगाव व विसापूर फाटा ता.श्रीगोंदा येथे घडलेल्या थरारक घटनेत चार जणांची हत्या झाल्याची माहिती आहे. चौथ्या व्यक्तिचा मृतदेह सापडत नव्हता तो विसापूर फाटा लगत सापडला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com