श्रीगोंद्यात सकाळी बंद, दुपारी व्यवहार सुरळीत

श्रीगोंद्यात सकाळी बंद, दुपारी व्यवहार सुरळीत
श्रीगोंदा बंद (File Photo)

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुका (Shrigonda Taluka) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेते कार्यकर्ते यांनी श्रीगोंद्याचा (Shrigonda) सोमवार हा बाजार दिवस असल्याने मध्यम मार्ग काढत व्यापार्‍यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद मिळाला दुपारी बारानंतर बाजारपेठमध्ये (Market) व्यवहार सुरळीत सुरू झाले.

यावेळी आंदोलनात (Movement) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी यांनी शनीचौकात एकत्र येत बंदचे नियोजन केले. मात्र, सोमवार हा श्रीगोंद्याचा बाजार (Shrigonda Market) असल्याने हा बंद दुपारी बारा वाजेपर्यंत पाळण्यात यावा दुपार नंतर शहरातील दुकान सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.