श्रीगोंद्यात तलाठी, मंडलाधिकारी यांचा सोयीनुसार कारभार

तालुक्यात तडजोडीतल्या फेरफार नोंदी मंजुरीलाच प्राधान्य
श्रीगोंद्यात तलाठी, मंडलाधिकारी यांचा सोयीनुसार कारभार
श्रीगोंद्या तलाठी

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

कुठेही गेले तरी शेती आणि शेतकरी यांना तलाठी कार्यालयाच्या उंबरठ्यावर गेल्याशिवाय पर्याय नसतो. आता सरकारने महसूलचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी आपली चावडीसारखे पोर्टल सुरू केले आहे. तरीही तलाठी आणि मंडलाधिकारी अजूनही सोयीनुसार आणि तडजोडीतल्या नोंदी मंजूर करण्याला पहिले प्राधान्य देत आहेत. अनेक सामान्य शेतकर्‍यांना आपल्या फेरफारीच्या नोंदी मंजूर होण्यासाठी तालुक्यातील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

‘जे नसे ललाटी ते लिखे तलाठी’ अशी ग्रामीण भागात मराठी म्हण आहे. याचा अनुभव सध्या श्रीगोंदा तालुक्यातील सजा म्हणजे शहरातील आणि ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना येत आहे. गावचा कामगार तलाठ्याच्या कारभारामुळे शहरातील शेतकर्‍याना फटका बसत आहेत. सातबाराच्या सह्यासाठी तासंतास बसावे लागत आहे. अन्य दाखले तर मिळतच नाहीत. कुणाचे काम वेळेवर होत नाही. ज्याची असेल ओळख त्याचेच काम होत आहे. यापुढे जाऊन तलाठी आणि मंडलधिकारी शेतकर्‍यांनी केलेले खरेदी विक्रीच्या दस्ताची, गहाण खताची फेरफार नोंद करताना कुणाच्या नोंदी वेळेवर होतील याचा भरोसा राहिला नाही.

ज्यांची ओळख आहे, त्यांचे फेरफार मंजूर केले जात आहेत. तर ज्याची ओळख नाही त्यांचे फेरफार मंजूरच केले जात नाहीत. अनेक फेरफार मंजूर करताना या बाबतीत आलेल्या हरकतींचा विचार न करताच नोंदी मंजूर केल्या जात आहेत. आपली चावडी या पोर्टलवर टाकलेल्या फेरफार नोंदी पाहिल्या तर मागील एकवर अशाच प्रकारे गावदप्तरी नोंदी करताना तलाठी आणि मंडलाधिकारी कुठल्याच प्रकारे पाहणी न करता ज्याची ओळख असेल त्याचे काम अगोदर करत आहेत.जो अगोदर देईल दाम त्यांचे काम अगोदर केले जात आहेत. पूर्वीच्या अनेक नोंदी रखडल्या आहेत; मात्र नंतरच्या नोंदी गाव दप्तरात केल्याचे दिसून आले आहे.

शासन निर्णय नामांकन विहीत करण्यात येईल, अशी सूचना मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने, फेरफार नोंदवहीत नोंद करील. परंतु असे की, भारतीय नोंदणी अधिनियम, 1908 अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणार्‍या अधिकार्‍यांसमोर ज्या व्यक्तींनी स्वतः दस्तऐवज निष्पादित केले असतील, अशा व्यक्तींना तहसीलदार कार्यालयातील तलाठ्याद्वारे तरतूद केलेली अशी कोणतीही सूचना पाठविणे आवश्यक असणार नाही, असे जीआर आहे. मात्र हा आदेश असताना रखडलेल्या नोंदी कधी होणार किंवा संबंधिताना नोटीस बजावली का? असे विचारले तर आदेश दाखवला जातो मात्र ज्यांचे हितसंबंध आहेत, अशांच्या नोंदी तातडीने नोंद मंजूरी केल्या जात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com