भैरवनाथ सोसायटी सचिवाचे निलंबन

कुटुंबालाच घेतली कर्जमाफी
भैरवनाथ सोसायटी सचिवाचे निलंबन

श्रीगोंदा | प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळी लोणार (Takali Lonar) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे (Bhairavnath Society) सचिवाने संस्थेत अनियमित कारभार केला आहे. पदाचा गैरवापर करून कुटुंबातील सभासदांच्या नावे बोगस कर्ज काढून त्यांना कर्जमाफीचा लाभही घेतला. जिल्हा निबंधकांच्या चौकशीत ही बाब समोर आल्याने त्याचे निलंबन करण्यात आले आहे.

भैरवनाथ सोसायटी सचिवाचे निलंबन
टाकळीमियात चोरट्यांचा धुमाकूळ; मेडिकल, किराणा दुकान, घरांना केले लक्ष

सुभाष निकम असे कारवाई झालेल्या सचिवाचे नाव आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार सचिव निकम यांनी स्वतःच्या कुटुंबातील सभासद व स्वतःच्या पत्नीच्या नावे क्षेत्र नसतानाही 60 हजार रुपये कर्ज घेतले. त्याचप्रमाणे सरस्वती निकम 60 हजार रुपये (क्षेत्र 0.04 आर), सुवर्णा निकम क्षेत्र नसतानाही 60 हजार रुपये, सुष्मिता निकम 60 हजार रुपये (क्षेत्र 17 आर), वैशाली दादा निकम 60 हजार रुपये (क्षेत्र 16 आर) असे 3 लाख ररूपयांचे बोगस कर्ज उचलले होते. संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीवरून निकम यांच्या कुटुंबातील सर्व सभासदांच्या कर्ज खात्याची उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी तपासणी केली असता निकम यांनी पदाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. स्वतः ही कर्ज रक्कम 1 लाख 60 हजार रुपये व त्याचे प्रत्यक्ष होणारे व्याज रक्कम 56,430 रुपये मिळुन 2,16,430 रुपये होतात मात्र त्यांनी व संस्थेचे लिपिक संभाजी गोरख गलांडे यांनी संगनमत करुन व्याज 30,857 रू.घेऊन 1,90,857 रुपयांची कर्ज माफी घेतली. तसेच सर्व कुटुंबातील सर्व सभासदांची मिळुन 4,15,110 रुपयांची नियमबाह्य कर्जमाफी घेतली.

याचा ठपका ठेवत नगर जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी सभा दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजीच्या सभेतील ठरावनुसार सुभाष निवृत्ती निकम यांना भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी टाकळी लोणार या संस्थेत आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेचे पोटनियमबाह्य कामकाज केलेले असून संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आणलेली असल्याने त्यांना दिनांक 10 ऑगस्टपासून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com