श्रीगोंदा : रविवारीच्या दिवशी महावितरणचा थकीत ग्राहकांना झटका

श्रीगोंदा : रविवारीच्या दिवशी महावितरणचा 
थकीत ग्राहकांना झटका

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा (Shrigonda) शहरात महावितरणच्या (MSEDCL) शहर अभियंता आणि त्यांच्या टीम मे थकीत ग्राहकांच्या विजेच्या बिलाच्या वसुलीसाठी (Recovery of electricity bills) मोहीम सुरू केली.

यात ज्या ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे. त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात (electricity connection cut) आले. सुट्टीच्या दिवशी वीज कट करू नका, अशा विनंतीकडे महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्षच (MSEDCL officers Ignore) करून शहरअभियंता यांनी वरिष्ठ उपविभागीय अभियंता अनिल चौगुले यांच्याकडे बोट दाखवले. अनेक ग्राहक उपविभागीय अभियंता चौगुले यांच्या संपर्क साधला असता त्यांनी डिफॉल्टर असणार्‍यांनी बिल भरावे. थकीत वीज कनेक्शन कट करण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे सांगितले. अनेक वीज ग्राहकांची रविवारच्या (sunday) दिवशी वीज कनेक्शन तोडल्याने त्यांची चांगलीच पळापळ झाली.

नोटीस न देता कारवाई

याबाबत उपविभागीय अनिल चौगुले यांच्या कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना उत्तर देताना त्यांनी जे डिफॉल्टर ग्राहक आहेत. त्यांना वीज कनेक्शन तोडताना कुठल्याही प्रकारे नोटीस देणे गरजेचे नाही. नोटीस न देता वीज तोडली जाईल असे सांगितले.

Related Stories

No stories found.