नागवडेंविरोधात मगर- पाचपुते गटाची आघाडी

श्रीगोंदा साखर कारखान्यासाठी तोडीस तोड 44 उमेदवार रिंगणात
नागवडेंविरोधात मगर- पाचपुते गटाची आघाडी
File photo

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखाना निवडणूकची रणधुमाळीने गती घेतली असून आज अर्ज माघारी च्या शेवटच्या दिवशीच दोन्ही गटाचे तोडीस तोड प्रत्येकी 21 असे 42 तर दोन अपक्ष असे 44 उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे च्या पॅनल विरोधात केशवराव मगर आणिआमदार बबनराव पाचपुते गटाने तोडीस तोड उमेदवार देत निवडणुकीत रंगत वाढवली आहे.

सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्याच्या 14 जानेवारी रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र नागवडे गट विरुद्ध आ. बबनराव पाचपुते व माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्यात 21 विरुध्द 21 अशी सरळ लढत होणार असून. कुकडी कारखान्याच्या निवडणुकी प्रमाणे बिनविरोध साठी दोन्ही गटाला कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे यश आले नसल्याने आता या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूकीचे निवडणूक रंगत वाढली असून अगोदर पासून कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात त्यांचे सहकारी माजी व्हाईस चेअरमन केशवराव मगर यांनी आघाडी उघडली होती.त्यात माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते याची साथ मगर याना मिळाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. दोन्ही गटाचे उमेदवार तोडीस तोड देण्यात आले आहेत.

उमेदवार असे

किसान क्रांती पॅनल नागवडे गट श्रीगोंदा गट- सुभाष शिंदे, बाबासाहेब भोस,

काष्टी गट - नागवडे गट- राजेंद्र नागवडे, राकेश पाचपुते,

कोळगाव गट- घाडगे श्रीनिवास, शरद जगताप

बेलवंडी गट - काकडे दत्तात्रय, रायकर लक्ष्मण, लबडे भीमराव टाकळी कडेवळीत- नेटके भाऊसाहेब, दरेकर प्रशांत, रसाळ सुरेश ,लिंपणगाव गट - जंगले विठ्ठल, शिपलकर प्रशांत, गिरमकर विश्वनाथ,

उत्पादक सहकारी संस्था- राजेंद्र नागवडे.

अनुसूचित जाती जमाती- जगताप बंडू,

महिला प्रतिनिधी- मंदाकिनी पाचपुते, औटी मेघा

इतर।मागासवर्गीय- हिरवे सावता

भटक्या विमुक्त जाती- भाऊसाहेब बरकडे.

सहकार विकास पॅनल पाचपुते-मगर गट- श्रीगोंदा गट- शिंदे जिजाबापू, भोस बापूसाहेब

काष्टी गट- पाचपुते भगवानराव, पाचपुते वैभव

कोळगाव गट- फराटे महादेव, थिटे देविदास,

बेलवंडी गट- शेलार आण्णासाहेब, रायकर तुळशीराम, काकडे विकास

टाकळी कडेवळीत गट: रसाळ लक्ष्मण, गव्हाणे हरीचंद्र , पवार रोहिदास

लिंपणगाव गट- केशवराव मगर, शांताराम भोईटे, हरिभाऊ कुरूमकर

उत्पादक सेवा संस्था- प्रवीण कुमार नाहाटा,

अनुसूचित जाती जमाती- सोनवणे राजेंद्र,

महिला प्रतिनिधी- प्रतिभा पाचपुते, सुरेखा काळाने

इतर मागासवर्गीय गट- बोरुडे उमेश

भटक्या विमुक्त जाती जमाती- राहिंज अशोक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com