
श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
शहरातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग शाखेत शिकत असताना कॉलेजच्या वस्तीगृहातच एका विद्यार्थीनीने दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका दुर्गम खेडेगावात वास्तव्य असलेल्या आणि शिक्षणा निमित्त श्रीगोंदा शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज दिनांक 22 फेब्रुवारी 2023 बुधवार रोजी दुपारी होस्टेलच्या रूममध्ये पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये कॉलेजच्या मुख्यध्यापकांना आढळून आला. सदर मुलगी दरवाजा उघडत नसल्याने काही महिला शिक्षकांनी नमूद बाब प्राध्यापकांना सांगितली.
यावर नमूद खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर सदर सर्व प्रकार समोर आला. या घटनेबाबत अमोल नागवडे यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला खबर दिली. पोलीस निरीक्षक रामराव ढीकले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेश जानकर पुढील तपास करत आहेत.