file photo
file photo
सार्वमत

राज्यातील बाजार समित्यांचा उद्या लाक्षणिक संप

Arvind Arkhade

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

भारत सरकारने दिनांक 5 जून 2020 रोजी नुकताच शेतीमाल अन्नधान्य नियमनमुक्त केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यापुर्वी फळे व भाजीपाला नियमन मुक्त झाल्यामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न घटलेले आहे. बाजार समितीस शासन कुठल्याही प्रकारचे अनुदान देत नाही परंतु संपूर्ण नियंत्रण शासनाचे आहे.

कर्मचार्‍यांचे वेतन बाजार समितीच्या उत्पन्नातून होत असल्याने उत्पन्न नसल्यामुळे कर्मचार्‍याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. केंद्र सरकारने देशामध्ये बाजार समित्यांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. देशातील बाजार समिती कर्मचार्‍यांना केंद्र शासनाचे अथवा राज्य शासन सेवेत घेण्यात यावे अथवा पगारासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांचेकडे केलेली आहे.

केंद्र शासनाचे नियमनमुक्ती धोरणा विरोधात राज्यातील सर्व बाजार समित्या शुक्रवारी (दि.21) रोजी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांच्यावतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बाजार समितीचे कामकाज बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेबरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com