श्रीगोंदा सोसायटीच्या 12 जागांसाठी 27 अर्ज

नागवडे विरूद्ध जगताप गटाची सरळ लढत
श्रीगोंदा सोसायटीच्या 12 जागांसाठी 27 अर्ज

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरातील शंभर वर्षे जुनी असलेली श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 13 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. नागवडे समर्थक विरोधात जगताप समर्थक गट अशीच लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार असून नागवडे समर्थक पॅनलची एक जागा बिनविरोध झाली तर उर्वरित बारा जागांसाठी सत्तावीस अर्ज राहिले आहेत.

शहरातील श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत एकूण 2013 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. सर्वसाधारण गटाच्या 8 जागासाठी 17 अर्ज राहिले आहेत. तर माहिलांच्या 2 जागांसाठी 4 अर्ज राहिले आहेत.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील 1 जागेसाठी 4 अर्ज राहिले आहेत. भटके विमुक्त जाती प्रवर्गातील 1जागेसाठी 2 अर्ज राहिले आहेत. इतर मागास प्रवर्गातील 1 जागेवर नागवडे गटाचे भीमराव आनंदकर बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अभिमन्यू थोरात काम पाहत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com