श्रीगोंद्यात मुलींच्या नावाने सोशल मीडियात फेक अकाउंट

फक्त मुलींचेच मोबाईल होतात हॅक
श्रीगोंद्यात मुलींच्या नावाने सोशल मीडियात फेक अकाउंट

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून केवळ मुलींच्या नावाने बोगस फेसबुकसह सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून बदनामीकारक मजकूर इतरांना पाठवले जात होते. आता तर काही घटनांमध्ये काही मुलींचे मोबाईलनंबरच हॅक करून त्यांच्या मोबाईलमधले इतर नंबर अ‍ॅड करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवण्याचे प्रकार हॅकर करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत वेगवेगळे दोन गुन्हे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत.

सध्या सर्वांच्या हातात अँड्रॉईड मोबाईल आले. त्यात करोना काळात ऑनलाईन शिक्षण असल्याने लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोबाईल गरजेचा झाला असून मोबाईलमध्ये येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप आणि मॅसेजची लिंक ओपन केल्यावर मोबाईलमधील डाटा हॅक करण्याचे प्रकार श्रीगोंदामध्ये घडले आहेत. विशेष म्हणजे शहरातील काही महाविद्यालयीन मुलींचे नंबर हॅक करण्यात आले होते. यातील काही पालकांच्या लक्षात आल्यावर याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली तर यानंतर नगरला सायबर शाखेत याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत.

या प्रकारात काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना नाहक मनस्ताप या मोबाईल हॅक करण्याच्या प्रकारामुळे झाला आहे. हॅक केलेल्या नंबरवरून मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असणार्‍या इतरांना मेसेज पाठवणे, त्या नंबरच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणे त्यात अनेक नंबर अ‍ॅड करणे असे प्रकार हॅकर करत आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला. यात एक तरुणाने मुलीचा फोटोचा डीपी घेऊन तिच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंट काढले होते. यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल आहे. तर दुसर्‍या प्रकारात अज्ञान व्यक्ती विरोधात मोबाईल नंबर हॅक करण्यात आल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com