साईकृपा शुगर इंडस्ट्रीजमधील कोट्यावधी रूपयांचे कॉपर व ऑईल चोरी

साईकृपा शुगर इंडस्ट्रीजमधील कोट्यावधी रूपयांचे कॉपर व ऑईल चोरी

श्रीगोंदा|ता. प्रतिनिधी| Shrigonda

आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबियांच्या सदस्यांची भागीदारी असणार्‍या साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड हिरडगाव येथील

साखर कारखान्यात एक कोटी 41 लाख 88 हजार तीनशे वीस रुपये किमतीचे अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफार्मर मधील कॉपर व ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू होत असले तरी हिरडगाव येथील साईकृपा इंटिग्रेटेड साखर कारखाना सुरू झाला नसताना याच कारखान्यात अज्ञात

चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल पाच ट्रान्सफार्मर मधील 48 हजार 880 किलोग्रॅम कॉपर (प्रतिकिलो अंदाजे 264 रुपये प्रमाणे) व त्याच पाच पैकी 132 के व्ही च्या एका ट्रान्सफर्मर मधील 25 हजार 680 लिटर ऑइल प्रति लिटर अंदाजे 50 रुपये असा एकूण एक कोटी 41 लाख 88 हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत असिस्टंट लीगल ऑफिसर सुनील गोरख दरेकर यांनी फिर्याद दिली आहे.

तसेच जून 2020 ते 28 ऑक्टोबर 2020 रोजी दरम्यान श्री साई कृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड हिरडगाव मधील मिल सेक्शन, पॉवर हाऊस सेक्शन व स्विच यार्ड विभाग या ठिकाणी ही चोरी करण्यात आली आहे.

याबाबत श्रीगोंदा पोलिसात 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी तसेच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com