श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ रस्त्यासाठी मिळणार 23 कोटीचा निधी
File Photo

श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ रस्त्यासाठी मिळणार 23 कोटीचा निधी

श्रीगोंदा |ता.प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा श्रीगोंदा ते मांडवगण रस्ता व श्रीगोंदा-पारगाव सुद्रीक रस्ता व पेडगाव येथील पुलासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी दिली.

श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा श्रीगोंदा - मांडवगण रस्ता दुरुस्ती साठी केंद्रीय मार्ग निधी मधुन सुमारे 12 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून श्रीगोंदा ते खाकिबा देवस्थान पर्यंत काम होणार आहे. या रस्त्यावरुन नगरला जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त होणे गरजेचे होते. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे.

त्याचबरोबर श्रीगोंदा ते पारगाव रस्त्यासाठी 4 कोटीचा निधी व पेडगाव येथील मोठ्या पुलासाठी सुमारे साडे सहा कोटी रुपयांचा निधी 2021 च्या अर्थसंकल्पात मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

तालुक्यातील या सर्व कामांसाठी सुमारे 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. व लवकरच ही कामे सुरू होतील असेही आ. पाचपुते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com