श्रीगोंदा |तालुक प्रतिनिधी| Shrigonda

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सरपंच पदांची आरक्षणे निश्चित करून सदर सरपंचांचे आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप केलेले असून

अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एकूण 1218 सरपंचपदांपैकी 151 सरपंचपदे अनुसूचित जातीसाठी (75 व्यक्ती व 76 महिला) , 83 सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी (41 व्यक्ती व 42 महिला), 329 सरपंचपदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (त्यात 164 व्यक्ती आणि 165 महिला), तर 655 सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी (त्यात 327 व्यक्ती व 328 महिला) निश्चित करण्यात आली आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील एकूण 86 सरपंचपदे असून, त्यापैकी 12 अनुसूचित जातीसाठी (त्यात 6 व्यक्ती व 6 महिला), पाच सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी (त्यात 3 व्यक्ती व 2 महिला), तेवीस सरपंचपदे नागरिकांचा मागास प्रवर्ग (त्यात 12 व्यक्ती व 11 महिला), सेहचाळीस सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी (त्यात 23 व्यक्ती व 23 महिला) राहणार आहेत.

86 पैकी 12 सरपंचपदे अनुसूचित जाती आणि 5 सरपंचपदे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा विचार करून निश्चित केली जातील.

86 सरपंचपदांच्या 27% म्हणजेच 23 पदे चक्रानुक्रमे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी ठरविली जातील व त्यामध्ये 11 महिलांची आरक्षणे सोडत पद्धतीने निश्चित केली जातील. 46 सरपंचपदे चक्रानुक्रमे खुल्या प्रवर्गासाठी ठरविली जातील आणि त्यात 23 सरपंचपदे सोडत पद्धतीने महिलांना दिली जातील.