श्रीगोंदा तालुक्यात नव्याने 89 पॉझिटिव्ह रुग्ण

आतापर्यंतचा आकडा 17 हजारांवर
श्रीगोंदा तालुक्यात नव्याने 89 पॉझिटिव्ह रुग्ण
34 पॉझिटिव्ह

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यात सोमवारी (दि.13) नव्याने 89 जण पॉझिटिव्ह (Positive) आले. घेतलेल्या 685 रॅपिड अँटीजेन चाचण्यांत (Rapid Atigen Testing) 26 जण संक्रमित आढळले तर नगर येथून आलेल्या अहवालात 63 व्यक्ती पॉझिटिव्ह (Positive) असल्याचे निदान झाले. यात 40 महिला व 49 पुरुष रुग्णांचा सामावेश आहे. 337 संशयित रुग्णांचे घशातील नमुने घेऊन नगर (Nagar) येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. आत्तापर्यंत एकूण बधितांची संख्या 17,083 झाली आहे. तर एकूण 221 जणांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात सद्यस्थितीला 367 सक्रिय रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. शासकीय कोविड केंद्रात 47, गाव पातळीवरील कोविड केंद्रात 43, ग्रामीण रुग्णालयात 23 व खाजगी हॉस्पिटलमध्ये 254 जण उपचार घेत आहेत.

सोमवारी श्रीगोंदा शहरात (Shrigonda City) 32 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या तर तालुक्यातील ग्रामीण भागात आढळगाव 1, अजनुज 2,, बेलवंडी बुद्रुक 2, बेलवंडी कोठार 1, भानगाव 1, भिंगाण 1, बोरी 1, चांडगाव 2, चिंभळा 1, चोराचीवाडी 1,देऊळगाव 4, घारगाव 3, घोगरगाव 1, घोटवी 1, घुगलवडगाव 4, हंगेवाडी 1, काष्टी 2, कौठा 1, कोळगाव 5, कोंडेगव्हाण 1, लिंपणगाव 1, मढेवडगाव 2, म्हातारपिंप्री 3, मुंढेकरवाडी 1, पेडगाव 2, रुईखेल 1, सांगवी 1, शिरसगाव बोडखा 2, टाकळी कडेवळीत 5, टाकळी लोणार 1, विसापूर 2, व वांगदरी येथे 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com