श्रीगोंद्यात नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

महामार्गाच्या निकृष्ट कामाचा परिणाम, नागरीक संतप्त
श्रीगोंद्यात नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शहर व परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे लगतच्या शेंडगेवाडी मधील अनेक घरांत पावसाचे पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. तर घरांच्या अंगणांना तळ्याचे स्वरूप आले आहे. महामार्गाच्या बाजुला गटारलाईन नसल्याने घरात पाणी शिरल्याचे अरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढवण्यात आली मात्र त्याच्या बाजूने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटार लाईन तसेच इतर व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी येत असलेल्या अडथळ्यांमुुळे शेतकर्‍यांच्या घरात पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेंडगेवाडी परिसरात रस्त्याची उंची जास्त झाल्यामुळे घरे खाली गेली आहेत. यामुळे मच्छिंद्र लहानु शेंडगे, गोरख लहानु शेंडगे, रोहिदास लहानु शेंडगे, बबन लहानु शेंडगे, सुदाम दादा शेंडगे, अशोक बापूराव शेंडगे, सुरेंद्र बापूराव शेंडगे या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. दोन दिवस उलटूनही प्रशासनाने योग्य ती पावले न उचलल्यामुळे आजही या नागरिकांच्या घरात पाणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com