श्रीगोंदा : कांदा उत्पादक शेतकरी नगर-दौंड रस्त्यावर

विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी आक्रमक
श्रीगोंदा : कांदा उत्पादक शेतकरी नगर-दौंड रस्त्यावर

श्रीगोंदा| प्रतिनिधी | Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती या खाजगी बाजारात शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणल्यावर केवळ वीस ते तीस रुपये बाजार मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले.

अन्य बाजार समितीत कांद्याचा बाजार पन्नास रुपये किलो गेले असताना चैतन्य बाजार समितीच्या मधील व्यापारी यांनी कांदा बाजार कमी काढले असल्याने शेतकरी आक्रमक भूमिका घेतली. थेट नगर दौंड महामार्ग अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. मात्र पोलीस वेळेवर आल्याने जमाव पांगवण्यात आला आहे.

येथे विक्रीसाठी आलेला काही कांदा हा कमी गुणवत्ता असलेला खराब होता. याला जास्त बाजार देणे शक्य नसल्याने काही शेतकरी आंदोलन करत असावेत. जर बाजार योग्य मिळत नाही, असे वाटत असल्याने इथे कांदा विक्री न करता अन्य ठिकाणी विक्री करावा

विठ्ठलराव वाडगे (अध्यक्ष, चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती )

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com