नाजूक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून
सार्वमत

नाजूक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

तालुक्यातील म्हातारप्रिंप्री येथील एका 42 वर्षीय व्यक्तीने गावातील नरेंद्र सयाजी वाबळे याच्या डोक्यात नाजूक संबंधाच्या संशयातून कुर्‍हाडीचे घाव घालून उसाच्या शेतात ठार मारले. यांनतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पंचनामा, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी, की म्हातारप्रिंप्री येथे सबंधित आरोपी हा हमाली काम करून उपजीविका करत असतो. सध्या लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने तो घरीच होता. नरेंद्र वाबळे या गावातील व्यक्तीवर नाजूक संबंंधाचा त्यााला संशय होता.

लॉकडाऊनच्या काळात घरीच असल्याने 20 जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला उसाच्या शेतात नरेंद्र वाबळे गेला असता त्याच्या मागावर असलेल्या आरोपीने उसाच्या फडात कुर्‍हाडीने वाबळे याच्या तोंडावर सपासप वार करून खून केला. यानंतर आरोपी हा श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यात आला.

इथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्याने आपण अनैतिक संबंधातून खून केल्याची सांगितले. यांनतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Deshdoot
www.deshdoot.com