श्रीगोंदा नगरपालिकेत आघाडीचा गटनेता बदलणार

पोटेंवर अविश्वास, भोस यांच्या नावाचा अर्ज
श्रीगोंदा नगरपालिकेत आघाडीचा गटनेता बदलणार

श्रीगोंदा | तालुका प्रतिनिधी

नगरपालिकेत आघाडीचे गटनेता मनोहर पोटे यांच्याविरोधात अविश्वास दाखवत नवीन गटनेता म्हणून गणेश बाबासाहेब भोस यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. या पत्रावर पाच नगरसेवकांच्या सह्या आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी श्रीगोंदा गट नोंदणी मधील गटनेता बदलाबाबत नगरसेवक नाव गोरे, संतोष कोथिंबीरे, निसार बेपारी, सोनाली घोडके, गणेश बाबासाहेब भोस या पाच नगरसेवकांनी सह्या व अंगठे दित भोस यांची गटनेते पदी नवीन निवड केली. फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आघाडीच्या गटाच्या सभेत मनोहर रामदास पोटे यांची गटनेतेपदी नेमणूक केलेली होती.

परंतु गेल्या काही वर्षांपासून संबंधित गटनेते गटातील सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत. कोणतेही निर्णय बहुमताने घेतले जात नाहीत. तसेच गटविरोधी कारवाया केल्या जात असल्याच्या सदस्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत गटनेत्यांवर वैयक्तिक तक्रार अर्ज व याचिका दाखल झाले आहेत. अशा आहे.

असा परिस्थितीत त्यांनी गटनेतेपदी राहणे हे बहुमताच्या विरुद्ध असून याबाबत स्वतंत्र तात्काळ बैठक बोलवल्यानंतर पोटे गैरहजर राहिले त्यामुळे बैठकीमध्ये गटनेता बदलाबाबत बहुमताने निर्णय घेण्यात आला. प्रस्तुत अर्जाच्या अनुषंगाने गटनेता बदल्याची नोंद आपल्या दप्तरी घेण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com