श्रीगोंदा नगरपरिषद अंतर्गत 758 घरकुलांना मंजुरी

नगराध्यक्ष पोटे || 493 नागरिकांना सूचना पत्रांचे वितरण
श्रीगोंदा नगरपरिषद अंतर्गत 758 घरकुलांना मंजुरी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 758 घरकुले मंजूर झाली असून त्यातील 265 घरकुले बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. उर्वरित 493 घरकुल बांधकामे लवकर सुरू करावीत, असे आवाहन नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी केले.

नगरपरिषदेच्या सभागृहात घरकुल सूचना पत्र प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 493 मंजूर घरकुल लाभार्थीना सूचना पत्रांचे वाटप पोटे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, गटनेते मनोहर पोटे आदींच्या हस्ते करण्यात आले.

नगराध्यक्षा पोटे म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सर्व पात्रधारकांना मिळावा यासाठी आपण लक्ष देत असून नागरिकांमध्ये जनजागृती देखील केली आहे ज्यांनी अद्याप अर्ज केले नाहीत त्यांनी लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी.

उपनगराध्यक्ष संग्राम घोडके यांनी सूचनापत्र मिळालेल्या नागरिकांनी बांधकामे सुरू करावीत यात अडचणी आल्यास नगरपरिषद मदत करेल, असे आश्वासन दिले. अर्जावर पाठपुरावा करून 265 घरकुले मार्गी लागली आताही 493 प्रकरणांना मंजुरी मिळाली. यापुढे ज्यांना स्वतः ची जागा नाही पण जे झोपडपट्टी व इतर ठिकाणी राहत आहेत त्यांना शासकीय नियमाप्रमाणे घरकुल मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून याचा पाठपुरावा करत आहोत.

नागरिकांना आवास योजना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी गटनेते मनोहर पोटे यांनी केले. यावेळी बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके, रमेश लाढाणे, शहाजी खेतमाळीस, गणेश भोस, राजकुमार लोखंडे, सतीश मखरे, सीमा गोरे, गौतम घोडके, एस.पी.कोथिंबीरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com