श्रीगोंदा : रासपकडून दुधाचा टँकर अडवून आंदोलन
सार्वमत

श्रीगोंदा : रासपकडून दुधाचा टँकर अडवून आंदोलन

दूध उत्पादकांच्या मागण्यासाठी आंदोलन

Nilesh Jadhav

श्रीगोंदा | Shrigonda

आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई चौफुला येथील सहकारी दूध संघ येथे दुधाचा टँकर अडवून दूध उत्पादकांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी कोरडकर ,राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाप्रमुख संतोष जठार, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे, मढेवडगाव ग्रामपंचायत सदस्य राहुल साळवे, अनंत पवार, झुंबर बाप्पू हंडाळ, संतोष भोसले (लोकाधिकार आंदोलन जिल्हा समन्वयक) , ग्रामपंचायत सदस्य किसनजी मासाळ, सोशल मीडिया प्रमुख निखिल गावडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा लता सावंत, गोंडे मॅडम व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com