श्रीगोंदा तालुक्यात सापडली गांजाची शेती

श्रीगोंदा तालुक्यात सापडली गांजाची शेती

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील मांडवगण शिवारात शेतामध्ये गांजा पिकविणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. रामदास गेणु रायकर (रा. मांडवगण ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख 40 हजार रूपये किंमतीचा 54 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्ट 1885 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गावापासून दूर अंतरावर माळरानावरील शेतामध्ये रामदास रायकर याने गांजाची झाडे लावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. त्यांनी शनिवारी पथकासह रायकर याच्या शेतामध्ये छापा टाकला. यावेळी संपूर्ण शेतामध्ये लहान मोठी 110 गांजाची झाडे पोलिसांना मिळून आली.

पाच लाख 40 हजार रूपये किंमतीचा 54 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ढिकले, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, दादा टाके, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, प्रकाश दंदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com