kukadi
kukadi
सार्वमत

कुकडीच्या पाण्याने ताणले, मात्र पावसाने तारले

वेळेत आलेल्या पावसाने फळबागा वाचल्या ः खरिपाच्या पेरण्या उरकल्या

Arvind Arkhade

श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच निर्माण होत असताना यंदाही कुकडीच्या आवर्तनात फक्त पिण्याच्या पाण्याचे उदभव भरणार असल्याने शेतकरी शेतीला पाणी मिळणार नसल्याने चिंतित होते. पावसाने मात्र वेळेत हजेरी लावली आणि फळबागा वाचल्या. तर कायम कमी पाण्याचा भाग असणार्‍या मांडवगण, कोळगाव पट्ट्यात पाऊस पडल्याने तिथखरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील गावांचा विचार करता भीमा, घोड नदीच्या काठची गावे, काही घोड कालव्याच्या क्षेत्रात येणारी गावे, कुकडी कालव्याच्या लाभ क्षेत्रात येणारी बहुतांशी गावे आणि कायम पाण्याच्या बाबत कमी पर्जन्यमान असणारी कोळगाव आणि मांडवगण गटातीत गावे याठिकाणी सिंचनाचे सोर्स केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात.

असे तालुक्याचे तीन भाग होतात. त्यानुसार पिकांचे पट्टे ही ठरलेले असून भीमा, घोड आणि घोड च्या कालव्याच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र तर कुकडीच्या लाभक्षेत्रातील लिंबू, डाळिंब, द्राक्ष बागांबरोबर रब्बीचे क्षेत्र अधिक आहे. मांडवगण आणि कोळगाव पट्ट्यात खरिपाचे क्षेत्र अधिक आहे. तशी पाण्याची उपलब्धता असेल तर रब्बी पिकांच्या बरोबर फळबागांचे क्षेत्र वाढत आहे.

चालू वर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्वच भागांतील शेतकरी सुखावला असला तरी फळबागांना वेळेत पाण्याचा आधार पावसाने मिळाला आहे. सर्वाधिक पाऊस मांडवगण परिसरात तर कमी पावसाची नोंद श्रीगोंदा मंडलात झाली. बाजरी, तुरीची पेरणी सर्वाधिक झाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी गावांत लिंबू बागा आहेत. सुरुवातीला 60-70 रुपयांपर्यंत गेलेले लिंबाचे बाजार लॉकडाऊनच्या काळात कमी कमी होत गेले आणि आता केवळ पाच, सात रुपये किलोला बाजार मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी बाजार समिती, तहसीलदार हे मध्यस्थी करीत आहेत; मात्र बाजाराची लेवल वाढताना दिसत नाही.

पहिल्या टप्प्यात जेथे पेरण्या केल्या तेथे काही ठिकाणी उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या आल्या. यात सर्वाधिक तक्रारी बाजरीच्या उगवणीबाबत आहेत. नंतर ज्यांनी पेरणी केली त्यातील बहुतांशी पिके उगवली असून मका, सोयाबीन, उडीद, पेरणी क्षेत्र देखील वाढणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com