श्रीगोंदा : कुकडीच्या पाण्यावरून राजकारण तापल

श्रीगोंदा : कुकडीच्या पाण्यावरून राजकारण तापल

श्रीगोंदा | प्रतिनिधी

कुकडी कालव्याचे (Kukadi canal) सल्लागारपदी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते (Former Minister MLA Babanrao Pachpute) यांनी कुणाला सल्लागार नेमले नाही. मात्र कर्जत-जामखेडचे (Karjat Jamkhed) आमदार रोहीत पवार (MLA Rohit Pawar) यांनी कुकडीचे सल्लागार पदी घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांची नेमणूक केली असल्याने शेलार यांनी श्रीगोंदेकरांचा (Shrigonda) करेक्ट कार्यक्रम केल्याने कर्जतला (Karjat) जास्त पाणी गेले असा आरोप बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा (Balasaheb Nahata) यांनी पत्रकार परिषदेत करत श्रीगोंदा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले नसल्याचे खापर शेलार यांच्यावर फोडले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांनी बाजार समितीचे सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यात बोलताना त्यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नाबाबत केवळ पत्रकबाजी होत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका केली. यावेळी संभाजी बिग्रेडचे टिळक भोस, माजी नगरसेवक अखतर शेख आणि बापूराव सिदनकर उपस्थित होते.

नाहटा यावेळी म्हणाले की, तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यावर वचक राहिला नाही. बदली झालेले तहसीलदार म्हणत होते आपण पासष्ट लाख रुपये दिले होते. मग अश्या आधिकारी यांच्याकडून कसे काम होणार असे म्हणत तालुक्यातील एक नेत्याने गॅस पाईपलाईनच्या ठेकेदारकडे पन्नास लाख रुपये मागितले असल्याचा आरोपांचा पुनरुच्चार केला. तसेच, गॅस पाईपलाईनच्या ठेकेदारकडे पन्नास लाख मागितले तसेच काहींनी सिमेंट मागितले असल्याचे सांगत ठेकेदारला एक महिन्याच्या पासून दहा ते पंधरा जण खंडणी मागत आहेत. ठेकेदारकडे सर्व परवानगी आहेत.आपल्या तालुक्यातील काही संबंधित ठेकेदार घेऊन याबाबत तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटणार असल्याचे नाहटा म्हणाले.

पाण्याची जबाबदारी आमदारांचीच - शेलार

कुकडी, घोड पाणी प्रश्नांत आपण १९८६ पासून काम करत आहोत. कुकडीचे पाण्यासाठी आंदोलने केली यात आपल्याला आंदोलनाची किंमत ही चुकवावी लागलेली आहे. पाणी प्रश्नात  माझ्याविषयी संशय उत्पन्न होईल असे टीका होत आहे. मला श्रेयासाठी धडपड करायची गरज नाही. शेतकरी कल्याणासाठी काम करत आहे. दीर्घकाळ लोकप्रतिनिधी राहिलेले तालुक्यचे आमदार यांचीच कुकडीचे पाणी मिळाले नाही याची जबाबदारी आहे. कारण मागील पंचवार्षिकला पाण्याची जबाबदारी आमदाराची आहे असे सांगणारे पाचपुते यांनी आताही पाण्याची जबाबदारी घ्यावी असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले. घन:श्याम शेलार यांनी त्यांचे नव्याने सुरू केलेल्या राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी संजय आनंदकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, आपण पाण्यासाठी कायम संघर्ष केला आहे.अजित पवार जलसंपदा मंत्री असताना आपण जिल्हाध्यक्ष असताना कुकडीचे पाण्यासाठी आंदोलन केले होते. तालुक्यातील जनतेने कुकडीचे पाण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांना केले आहे. मग आता जबाबदारीची चर्चा करायची झाली तर पाचपुते आमदार नसताना कायम म्हणायचे पाण्याची जबाबदारी आमदार याची आहे. मग आताही विद्यमान आमदार म्हणून पाण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. पाचपुते यांना पाण्यासाठीच आमदार केले आहे. आपली कुकडीचे पाण्यासाठी असलेली धडपड ही पाचपुते ना मदतच आहे. काहींना करायचे काहीच नाही मात्र श्रेय घ्यायचे आहे. दीर्घकाळ पाचपुते लोकप्रतिनिधी आहेत. सगळे करताना अभ्यास करून बोलले पाहिजे. मूळ प्रश्न सोडवायचा असेल तर डिंभेचे पाणी मिळाले पाहिजे. यात डिंभे ,माणिकडोह टनेलचे पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. यातून कुकडीचा प्रश्न कायमस्वरूपी  कसा सुटावा यासाठी शरद पवार यांची भेट घेणार आहोत. काही जण सहज बोलणे आणि गप्पा मारण्याचा विषय कुकडी प्रश्न नाही. मतमतांतरे असावेत मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये. लोकप्रतिनिधी तारखेनुसार माहिती घेऊन शेतकऱ्यांना जागृत करायला पाहिजे होते असे यावेळी शेलार म्हणाले.

तसेच तालुक्यातील एक नेत्यावर बाळासाहेब नाहटा यांनी गॅस पाईपलाईन ठेकेदाराकडे पैसे मागितले असल्याचे आरोप करत असल्याबाबत विचारले असता शेलार म्हणाले कुणावर आरोप करायचे असतील तर ते पुराव्यानिशी सिद्ध केले पाहिजेत. कुणावर आरोप करताना पुरावे देऊन आरोप केले पाहिजेत असे शेलार यांनी प्रश्नांला उत्तर देताना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com