
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) (Ajnuj) येथील पाचवीत शिकणार्या अल्पवयीन मुलाचे अपहरण (Kidnapping of a Minor) झाल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत अल्पवयीन मुलाने अतिशोक्ती व चुकीची माहिती (Wrong Information) दिली असल्याचे समोर आले आहे. मुलाचे अपहरण (Kidnapping) झालेच नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली. पंरतु मद्य सेवन करून गाडी चालवणे व शासनाच्या नावाच्या पाट्या, अधिक नंबर प्लेट प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील (Shrigonda) अजनुज (आनंदवाडी) (Ajnuj) येथे 28 सप्टेंबर रोजी शाळकरी मुलाला पळून नेण्याच्या संशयावरून तसेच चाकू ( Knife) दाखवून दमदाटी केल्याचे मुलाच्या सांगण्यावरून ग्रामस्थांनी नासिर गुलाब पठाण व हरिभाऊ दत्तू वाळुंज या दोन तरुणांना मारहाण (Youth Beating) करत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच या प्रकरणी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या अपहरण प्रकरणाचे पोलीस तपास करत असताना स्थानिक व्यक्तींनी त्या मुलाचे अपहरण केले नव्हते तर तो मुलगा स्वतः होऊन त्या गाडीत बसला होता. तसेच त्यास चाकू देखील दाखवला नव्हता, तुझी किडनी काढून घेऊ असे देखील वक्तव्य कोणी केले नव्हते. त्या मुलाने अतिशोक्ती करून या गोष्टी सांगितल्या असल्याचे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (Shrigonda Police Station) पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले.
पंरतु या अपहरण प्रकरणातील संशयितांच्या विरोधात गाडीमध्ये विनापरवाना महाराष्ट्र शासन नावाची पाटी आढळून आल्याने शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी भादवी कलम 420 प्रमाणे आणि मुंबई दारूबंदी अधिनियम 85 नुसार व मोटार अधिनियम दारू पिऊन वाहन चालवणे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.
तसेच नागरिकांनी सतर्क राहून संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलीस ठाण्याची संपर्क करावा मात्र कायदा हातात घेऊ नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असेही ढिकले यांनी आव्हान केले आहे.
- रामराव ढिकले, पोलीस निरिक्षक श्रीगोंदा