काष्टीत गुटख्याच्या गोडावूनवर पोलीसांचा छापा

काष्टीत गुटख्याच्या गोडावूनवर पोलीसांचा छापा

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या गुटख्याच्या गोडाऊन वर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहिती नुसार

श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना काष्टी येथे मेन चौकात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना सूचना करत खात्री करण्यास सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजनकर यांनी काष्टी येथे जाऊन छापा टाकत विक्री करीता साठवून ठेवलेला विमल, माणिकचंद, हिरा गुटखा, सुगंधी तंबाखूसह मारुती सुझुकी कंपनीची नवी कोरी इको गाडीसह सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह सचिन पांडुरंग कोकाटे व दीपक नाना टकले या दोन जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजनकर, पो कॉ किरण बोराडे, प्रताप देवकाते, अमोल आबजे, कुलदीप घोळवे, किरण भापकर, संतोष कोपनर, प्रकाश मांडगे, दादासाहेब टाके, गोकुळ इंगवले यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com