श्रीगोंदा : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी जामदार, उपसभापतीपदी महांडूळे

सभापती आणि उपसभापती पद माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे गटांकडे आले आहे.
श्रीगोंदा : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी जामदार, उपसभापतीपदी महांडूळे

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत चुरशिच्या लढाईत जगताप, नागवडे गटाचे संजय जामदार यांनी 10 मते मिळवत सभापतीपदी बाजी मारली. तर पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना 7 मते मिळाली आहेत. तसेच मीना आढाव याना 1 मत मिळाले आहे.

उपसभापती संजय महांडुळे यांनी 10 मते मिळवत बाजी मारली तर विरोधी गटाचे वैभव पाचपुते यांना 8 मते मिळाली आहेत.

सभापती पदासाठी लक्ष्मण नलगे, मीना आढाव, संजय जामदार या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तर उपसभापती पदासाठी संजय महांडुळे, वैभव पाचपुते व मीना आढाव या तिघांनी अर्ज दाखल केले होते. मात्र आढाव यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे पाचपुते आणि महांडुळे यांच्यात लढत झाली. सभापती आणि उपसभापती पद माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे गटांकडे आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com