श्रीगोंद्यात गुटख्यासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

श्रीगोंद्यात गुटख्यासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा - काष्टी रोडवर पिकअप गाडीवर छापा टाकून श्रीगोंदा पोलीसांनी गुटख्यासह 9 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सोमवारी पहाटे केली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

उमेश शिवाजी वेताळ (28, रा . लिंपनगाव, ता . श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत, एक महिंद्रा बोलेरो पिकअप श्रीगोंदा ते काष्टी जाणार्‍या रोडने गुटखा घेऊन जात असल्याचे खबर मिळाली होती. ढिकले यांनी रात्र गस्तच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक समीर अभंग, रमेश जाधव, कर्मचारी संभाजी शिंदे , ईंगावले , प्रकाश मांडगे , अमोल आजबे, अमोल कोतकर, दादासाहेब टाके, किरण बोराडे यांच्या पथकांना छाप्यासाठी रवाणा केले.

पथकाने श्रीगोंदा ते काष्टी रोडवर हॉटेल अनन्या समोर सापळा रचुन संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी आडवुन झडती घेतली असता गाडीमध्ये 3 लाख 14 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत केलेला हिरा गुटखा पान मसाला, सुगंधी तंबाखु, अन्न पदार्थांचा साठा मिळुन आला. तसेच संशयिताच्या ताब्यातील 6 लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप गाडी (एम.एच. 12 - क्यु. डब्ल्यु . 5173) जप्त केली. असा एकुण 9 लाख 14 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयिता विरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वेताळ यास न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास उपनिरिक्षक समीर अभंग व पोकॉ किरण भापकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.