श्रीगोंद्यासाठी 34 कोटींचा निधी - आ. पाचपुते

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा निधी
पाचपुते
पाचपुते

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील विविध योजनांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 33 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीला मंजूर मिळाली असल्याची माहिती माजी मंत्री आ बबनराव पाचपुते यांनी दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री पाचपुते यांनी म्हटले आहे की, कुकडी डावा कालव्याचे नूतनीकरण कालव्याचे अस्तरीकरण भरावाचे मजबुतीकरण दुरुस्ती करणे वितरिका दुरुस्ती हंगा विमोचक बांधकामाचे दुरुस्ती करणे कुकडी डावा कालवा किलोमीटर 110 ते 165 मधील वितरीका बांधकामाची गळती प्रतिबंधक उपाय योजना करणे व चौक्या बांधणे या महत्वाच्या कामांसाठी 10 कोटी 54 लक्ष 25 हजार रुपये निधी. तर जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बेलवंडी बुद्रुक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. या योजनेसाठी 14 कोटी 26 लक्ष रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मौजे मढेवडगाव या गावासाठी नळ पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 8 कोटी 90 लाख रुपये प्रशासकीय मंजुरी मिळालेले आहे.

सदर कामाचे टेंडर प्रोसेस चालू आहे लवकरच हे काम प्रत्यक्ष चालू होणार आहेत. तरी सदर काम उत्कृष्ट दर्जाचे होणेबाबत परिसरातील ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी स्वतः लक्ष देऊन काम करून घ्यावीत असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे. तसेच इतरही कुठल्या गावाचे पाणी पुरवठ्याचे प्रस्ताव असतील तर ते करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणार आहोत अशी ग्वाही आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

आ. पाचपुते पुन्हा ऍक्टिव्ह

गेल्या वर्षभरात माजी मंत्री बबनराव पाचपुते हे सक्रिय नसल्याची चर्चा सुरू होती. बंधू सदाशिव पाचपुते यांचे निधन त्यानंतर शरीरावर झालेल्या शस्त्रक्रिया यामुळे डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. गेल्या काही दिवसांपासून पाचपुतेंचा झंझावात पुन्हा सुरू झाला. मतदार संघातील जनतेच्या सुख, दुःखात पाचपुते सहभागी होत आहे. शिवाय विरोधी पक्षात असताना देखील तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा आणलेला निधी बबनराव पाचपुते पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com