श्रीगोंदा फसवणूक प्रकरणी सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

श्रीगोंदा फसवणूक प्रकरणी सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंद्यातील फसवणूक प्रकरणातील सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. राजगड सहकारी साखर कारखान्यास फसवणुकीतील यंशयित धुळा दादा थोरात, संदीप दरवडे, नवनाथ देवकर, दत्तात्रय गजरे, सुनील शेंडगे, मल्हारी सरक यांच्यावर साखर कारखान्याकडून मजूर पुरवठ्यासाठी मोठ्या रकमेची उचल घेतल्याबाबत सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2022 या काळात करार करण्यात आले होते.

परंतु सदरील व्यक्तींनी गाळपासाठी मजूर न पुरवता तसेच पैसे परत न देता कृषी अधिकार्‍यांसोबत संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप होता. कारखान्याच्या प्रतिनिधीद्वारे राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. संशयितांच्या बाजूने पुणे जिल्हा न्यायालयात अ‍ॅड. अक्षय सुपेकर व अ‍ॅड. महेश देशमुख यांनी 17 फेबु्रवारी 2023 रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.

सदरील केस ही फक्त कराराच्या अटी शर्तीचा भंग असून दिवाणी केस असल्याचा तसेच मुळात फसवणुकीचा हेतू नाही. कुठलेही कायदेशीर विश्वस्त केले नसल्याने नातेसबंध यात येत नसल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरून सर्व आरोपीस पुणे येथिल मे. जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com