श्रीगोंदा कारखाना उभारणार सीबीजी गॅस, ब्रिकेट प्रकल्प

राज्यातील पहिला प्रयोग असल्याचा नागवडे यांचा दावा
श्रीगोंदा कारखाना उभारणार सीबीजी गॅस, ब्रिकेट प्रकल्प

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda

देशात आणि राज्यामध्ये पहिल्यांदा श्रीगोंदा सहकारी कारखाना बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर प्रेसमडपासून सी.बी.जी. गॅस व बगॅस पासून बिक्रेट तयार करण्याचा प्रकल्प हाती घेणार असल्याची माहिती चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात सहकारी कारखान्याच्या माध्यमातून हा पाहिला प्रकल्प ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

नागवडे म्हणाले, कारखान्यामध्ये प्रतिवर्षी जी प्रेसमड तयार होते त्यापासून सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. परंतु हा प्रकल्प उभारणी केल्यानंतर त्यापासून सुमारे 4 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या 3 कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. या प्रकल्पाची सी.बी.जी. गॅस निर्मिती प्रतिदिन क्षमता 5 मे.टन असणार आहे. वाहनांना इंधन गॅस वापरला जाणार आहे. सदरचा सीबीजी गॅस हा कारखान्याने शासनाच्या दराप्रमाणे घेऊन त्याची आउटलेटद्वारे विक्री केली तर त्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयांचे उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे.

त्याचप्रमाणे बगॅसपासून हायडेसिग्नेटेड स्टॉल्क ( ब्रिकेट ) प्रकल्पाने उभारणार आहे. सध्या बगॅस पासून साधारण 1300 ते 1400 प्रतीटन उत्पन्न मिळते. परंतु सदरचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर सुरुवातीस हा दर सुमारे 2000 ते 2100 रुपयापर्यंत मिळेल व नंतर या दरामध्ये आणखी 800 ते 1000 रुपयापर्यंत वाढ होईल .त्यामुळे कारखान्यास सुमारे 3 ते 4 कोटी रुपये नफा होणार आहे. साखरेसह अशा प्रकारचे दोन महत्त्वपूर्ण व लाभदायक प्रकल्प हाती घेणारा श्रीगेांदा सहकारी साखर कारखाना हा राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना असल्याचे नागवडे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.

कंपनीचा 15 वर्षांचा करार

या दोन्ही प्रकल्पाची संचालक मंडळाने समक्ष पहाणी करून व त्याचा अभ्यास करून हे दोन्ही प्रकल्प प्रायोगिक तत्वावर हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही प्रकल्प उभे करत असताना त्यामध्ये कारखान्याची कोणत्याही प्रकारची गुंतवणूक असणार नाही. त्याकरिता कारखाना फक्त जागा उपलब्ध करून देणार आहे. सदर कंपनीशी 15 वर्षांचा करार पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प कारखान्याकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com