श्रीगोंदाचे उपनगराध्यक्ष लाढाणे यांचा राजीनामा

श्रीगोंदाचे उपनगराध्यक्ष लाढाणे यांचा राजीनामा

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा नगरपालिकेचे (Shrigonda Magarpalika) उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे (Ramesh Ladhane) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

श्रीगोंदाचे उपनगराध्यक्ष लाढाणे यांचा राजीनामा
Video : राहुरी खुर्दमध्ये सरपंचपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले; काही काळ तणाव, पाहा व्हिडिओ

श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपचे (BJP) बहुमत आहे. मात्र जनतेमधून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आघाडीच्या शुभांगी पोटे (Shubhangi Pote) नगराध्यक्षा आहेत. पालिकेत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते (MLA Babarao Pachpute) गटाकडे बहुमत असल्यानं उपनगराध्यक्ष पद पाचपुते गटाकडे आहे. पाचपुते गटाच्या नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी यासाठी पाहिले एक वर्षाच्या कालावधीत अशोक खेंडके (Ashok Khendge) यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. यानंतर एक वर्ष रमेश लाढाणे यांनी उपनगराध्यक्ष पदावर संधी मिळाली होती.

श्रीगोंदाचे उपनगराध्यक्ष लाढाणे यांचा राजीनामा
पारनेरच्या करोना रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन तपासणी होणार; मुख्यमंत्र्यांची सुचना

एक-एक वर्ष उपनगराध्यक्ष पदाची संधी नगरसेवकांना देण्याचे पाचपुते गटाचे ठरले असल्याने रमेश लाढाणे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मागील वेळी उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांच्या नावाची चिठी टाकण्यात आली होती. आता कुणाला संधी मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com