श्रीगोंदा : अज्ञाताने कांद्यावर तणनाशक मारून केले शेतकऱ्याचे नुकसान

अज्ञात इसमाचा प्रताप; शेतकऱ्याचे ३० हजाराचे नुकसान
श्रीगोंदा : अज्ञाताने कांद्यावर तणनाशक मारून केले शेतकऱ्याचे नुकसान

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

महादेव पवार यांनी ११०० रुपये प्रमाणे नऊ पुडे कांद्याचे पंचगंगाचे बी आणले होते. मोठ्या मशागतीने त्यांनी कांद्याचे रोप तयार केले. त्यासाठी त्यांना पाच ते सात हजार रुपये खर्च आला. रोप तयार झाल्यानंतर ७५०० रुपये एकरा प्रमाणे ७० गुंठे कांद्याची लागवड करण्यासाठी त्यांनी १३ हजार रुपये खर्च केला. कांदा बी, जमिनीची मशागत आणि कांदा लागवड यासाठी त्यांना सुमारे ३० हजार रुपये खर्च आला.

एवढ्या कष्टाने केलेली कांदा लागवड कोणीतरी अज्ञात इसमाने रात्रीतून तणनाशक मारून संपूर्ण कांद्याचा नाश करून टाकला. शेतकरी अडचणींमध्ये आपली शेती करीत असताना दुष्ट प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवीत आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी महादेव पवार यांचा गुन्हा दाखल करून घेऊन दुष्ट प्रवृत्तीचे लोक शोधून काढावेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना चांगलाच धडा शिकवावा. अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com