बेलवंडीत चंदन तस्कर जेरबंद

पाचजण फरार
बेलवंडीत चंदन तस्कर जेरबंद

श्रीगोंदा | प्रतिनिधी

बेलवंडी (Belwandi) परिरातील शेतातुन चंदनाचे (Sandalwood) झाड चोरणार्‍या तस्कराला पोलीसांनी (Police) जेरबंद केले आहे. तर उर्वरित त्याचे सहा साथीदार फरार झाले आहेत. संजय गंगाधर माळी रा.पाचेगाव, (तालुका नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

बेलवंडी येथील नितीन भोसले यांच्या शेत गट नंबर 1502 चे बांधालगत असलेले चंदनाचे झाडे (Sandalwood trees) कापुन, उघड्यावरुन चोरी करण्याचा प्रयत्न टोळी करत होती. याची खबर बेलवंडी पोलीसांना (Belwandi Police) मिळाली होती. बेलवंडी येथील भोसले यांच्या शेतातील चंदन झाडे चोरी करू न नेताना पोलिसांनी छापा (Police raid) घातला. मात्र, केवळ एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला उर्वरीत पाच आरोपी फरार झाले.

यात वीस किलो चंदन, एक अल्टो (Aulto) कारसह चंदन चोरीचे साहित्य असे 40 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात संजय गंगाधर माळी याला पोलिसांनी अटक केली तर उर्वरित पाच जण फरार झाले. यात शिवाजी साहेबराव मोरे, संदीप कैलास मोरे, सतीश संजय माळी, राहुल संजय मांजरे, अरुण शिंदे यांच्या विरोधात चंदन चोरीचा गुन्हा बेलवंडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com