श्रीगोंद्यातील प्रेमीयुगुलाची आत्महत्या
सार्वमत

श्रीगोंद्यातील प्रेमीयुगुलाची आत्महत्या

कर्जत तालुक्यातील चखालेवाडीच्या विहिरीत

Arvind Arkhade

कर्जत|वार्ताहर|Karjat

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते; परंतु त्यांच्या या अनोख्या प्रेमाला कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून या दोघांनी एकमेकांच्या साथीने त्यांच्या या प्रेमकथेचा जीव देऊन शेवट केला. या घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मढेवडगाव येथील युवक हा बेलवंडी स्टेशन या परिसरामध्ये त्याच्या मावशीकडे जात असे यावेळी मावशीच्या शेजारी राहत असलेल्या 30 वर्षीय महिला सोबत त्याची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे ती स्त्री विवाहित होती. तिला दोन मुले आहेत, असे असतानाही या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले होते.

5 ऑगस्ट रोजी तो युवक मित्राची गाडी घेऊन बेलवंडी येथे आला. या ठिकाणी दोघांची भेट झाली आणि दोघेही गाडीमध्ये बसून आढळगाव मार्गे चखलेवाडी शिवारामध्ये आले याठिकाणी ते रात्रभर एकत्र होते. दुसर्‍या दिवशी या दोघांनी बाळासाहेब पवार या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये हातपाय एकत्र बांधले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट याठिकाणी पूर्ण झाली. लालासाहेब पवार यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. निरीक्षक सुनील गायकवाड पोलीस पथकासह घटनास्थळी आले. दोन्ही मृतदेह वरती काढण्यासाठी बराच वेळ लागला.

त्यानंतर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह दिले. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील मधुकर चव्हाण यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com