श्रीगोंद्यात कपाशी, गुलबी कांदा धोक्यात

65 मी.मी पावसाच्या अटीने शेतकरी अडचणीत
श्रीगोंद्यात कपाशी, गुलबी कांदा धोक्यात

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील भीमा, घोड नद्यांच्या पट्टयात उसाच्या पिकाबरोबर कपाशीचे क्षेत्र वाढत असताना यंदाच्या सततच्या पावसाने कपाशी सह आता गुलबी कांदाही पाण्यात गेला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पावसाचा परिणाम जाणवत असताना एकाच दिवशी 65 मिलीमीटर पाऊस झाला. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी शासन आदेश देखील आला नसल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील भौगोलिक दृष्टीने मांडवगण, कोळगाव मध्ये जिरायत पट्टा तर उर्वरित क्षेत्र कुकडी आणि घोड कालव्याच्या बरोबर भीमा, घोड नदीच्या काठी असणारे आहे. भीमा,घोड च्या पट्ट्यात ऊस क्षेत्र अधिक आहे .तर कुकडी कालव्याच्या क्षेत्रात फळबागा वाढल्या आहेत. लिंबु, डाळिंब, द्राक्ष बागा बरोबर खरिपात बाजरी, उडीद, सोयाबीन, कापूस, गुलाबी कांदा पिके घेतली जात आहेत.

या वेळी पाऊस पडण्याचे प्रमाण थोडे आधीक असले तरी या महिन्यात सातत्याने पाऊस पडत आहे. याचा परिणाम सर्व पिकांच्या बरोबर फळबागांवर देखील दिसायला लागले असून कपाशी पिके अनेक ठिकाणी सखल भागात पाण्याखाली गेली आहे. यामुळे अनेक ठिकाणी कपाशी ची वाढ बंद झाली आहे. गुलबी कांदा पिवळा पडायला सुरुवात झाली असून असाच पाऊस राहिला तर पेरणी केलेला कांद्या वाया जाणार आहे. उडीद, सोयाबीन, बाजरी काढणीला आले आहेत मात्र सूर्यदर्शन होत नसल्याने या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

वखारीतला कांदा सडला

तालुक्यातील बहुतांशी शेतकरी मागील वर्षी कांदा पिकाकडे वळले.कांद्याचे भाव वर्षभर पंधरा, वीस रुपयांचे पुढे गेले नाहीत यामुळे अनेकांना वखारीत ठेवलेला कांदा भाव वाढण्याची वाट पहात ठेवले आहेत. मात्र अजूनही म्हणावे असे भाव वाढले नसल्याने वखारीतला कांदा खराब होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com