श्रीगोंदा तालुक्यात करोनाचे नव्याने 38 रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 974 तर मृत्यूची संख्या 26 वर
श्रीगोंदा तालुक्यात करोनाचे नव्याने 38 रुग्ण

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा कोव्हिड केंद्रात शनिवारी (दि.5) 87 रॅपिड अँटीजेन चाचण्या घेतल्या. त्यात 38 जण संक्रमित सापडले.

त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 974 झाली आहे. दरम्यान कालअखेर 14 जण बरे झाल्याने करोना मुक्तांची संख्या 860 झाली आहे.

शुक्रवारी काष्टी येथील एक रुग्ण दगावल्याने करोना बळींची संख्या 26 वर पोहोचली आहे. तर 3 व 4 रोजी एकूण 44 जणांचे घशातील स्राव नगर येथे पाठविले आहेत त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीला 62 जण कोव्हिड केंद्रात उपचार घेत आहेत.

काल श्रीगोंदा शहर 5, पेडगाव 2, काष्टी 4, मढेवडगाव 3, घोगरगाव 4, चोराचीवाडी 2, बेलवंडी बुद्रुक 2, तर विसापूर, गणेशा, शेडगाव, आढळगाव, वडाळी, पारगाव, मुंढेकरवाडी, वांगदरी, म्हसे, बेलवंडी कोठार, खरातवाडी, तांदळी दुमाला, लिंपणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण संक्रमित सापडला, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

व्हेंटीलेटरसाठी मदतीचे आवाहन

श्रीगोंदा तालुक्यातील व शहरातील करोना बाधित रुग्ण केवळ ऑक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने दगावले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात मोठ मोठी हॉस्पिटल्स आहेत. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे एकही व्हेंटीलेटर नाही, ही खेदाची बाब आहे.

सध्या श्रीगोंदा शहरात डॉ. हिरडे, डॉ. होले व ग्रामीण रुग्णालय हे करोना रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु केवळ आर्थिक मदत मिळत नसल्याने त्यांना अत्यवस्थ रुग्णांना परत इतरत्र पाठवावे लागत आहे. तालुक्यातील सधन व दानशूर नागरिकांनी या करोना संकटकाळात मदतीसाठी पुढे येऊन गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचे आवाहन दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता जगताप यांनी केले आहे.

परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष हिरडे रुग्णांसाठी अत्यल्प दरात सेवा देत आहेत. दानशूर मंडळींनी पुढे येत व्हेंटिलेटर खरेदीसाठी मदत केली तर श्रीगोंदा शहर व तालुक्यातील करोना रुग्णांच्या दगावण्याचा दर कमी होऊ शकतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com