श्रीगोंदा तालुक्याचा करोना बाधितांचा आकडा तीनशे पार
सार्वमत

श्रीगोंदा तालुक्याचा करोना बाधितांचा आकडा तीनशे पार

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

तालुक्यातील विविध गावांत करोना बाधित रुग्णांचा आकडा तीनशेच्या पार गेला असून उपचार घेऊन बरे होणारी संख्या ही दोनशेच्या आसपास आहे.तीन जणांचे मृत्यू झाले आहे. शहर दोन दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले असले तरी तालुक्यात एकाच दिवशी 27 पॉझिटिव्हची भर पडली.

बुधवारी (दि. 5) 27 नवे बाधित रुग्ण अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 7 जण शहरातील आहेत. कोळगाव 4, मढेवडगाव 2, काष्टी 2, रुईखेल 2, पारगाव सुद्रीक 6, खरातवाडी, देवदैठण, येळपणे, बेलवंडी येथील प्रत्येकी एक असे बाधित 27 रुग्ण आहेत. काल 135 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात 27 बाधित सापडले.

तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढतच असून नवे 27 करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोना पॉझिटिव्ह आकडा 308 झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, तालुक्यातील एकूण करोना रुग्ण संख्या आता 308 झाली आहे. त्यातील 103 रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. 27 नव्या रुग्णांमध्ये त्यातील 7 जण शहरातील आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीम काम करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com