श्रीगोंदा तालुक्यात 13 बाधीत

करोना अपडेट
करोना अपडेट

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

रविवारी (दि. 4) पोलीस निरीक्षक जाधव यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितिन खामकर व

ग्रामीण रुग्णालयाचे पथक बोलावून पोलीस ठाण्यात हजर असलेल्या 31 पोलीस कर्मचार्‍यांची कोविड चाचणी घेतली त्यात फक्त 1 कर्मचारी पॉझिटिव्ह आला. 30 कर्मचारी निगेटिव्ह आले.

तालुक्यात रविवारी 144 रॅपिड अँटीजन चाचण्यात 11 जण पॉझिटिव्ह आले. तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात 2 जण संक्रमित आढळले. एकूण बधितांची संख्या 1776 झाली आहे.

रविवारी 20 जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे एकूण करोनामुक्तांची संख्या 1620 झाली आहे. आतापर्यंत 33 जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीला 62 जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. तर 55 जण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अजून नगर येथून 50 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

रविवार दि. 4 रोजी श्रीगोंदा शहरात पोलीस ठाणे व बसस्थानक परिसरात प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीण भागात लोणी व्यंकनाथ- 5, जंगलेवाडी- 2, घोडेगाव- 1, काष्टी- 1, येळपणे-1, पारगाव- 1 असे रुग्ण संक्रमित आढळले, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com