श्रीगोंदा तालुक्यात करोना बाधित रुग्णाचा चौथा बळी
सार्वमत

श्रीगोंदा तालुक्यात करोना बाधित रुग्णाचा चौथा बळी

Arvind Arkhade

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrirampur

करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस तालुक्यात वाढत असून बाधितांची संख्या 300 पार गेली असताना पॉझिटिव्ह असलेल्या येळपणे येथील 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण चार जण करोनाने बाधित होऊन मृत्यू पावले आहेत. करोनाबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रोजच बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.

तालुक्यातील येळपणे येथील 80 वर्षीय करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 4 झाली आहे. येळपणे येथील 80 वर्षीय व्यक्ती अगोदर आजारी होते. त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान गुरुवारपर्यंत 10 व्यक्तींच्या तपासणीत काहीजण करोना पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात हंगेवाडी येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. काळकाई चौक येथे 3, कौठे, येळपणे, देवदैठण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 315 पर्यंत बाधितांचा आकडा गेला आहे. उपचार घेऊन बरे होणार्‍यांची संख्या 200 च्या आसपास आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com