श्रीगोंद्यात दहाजणांचा करोनामुळे मृत्यू

श्रीगोंद्यात दहाजणांचा करोनामुळे मृत्यू

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीगोंदा तालुक्यात मंगळवार (दि.4) एकाच दिवशी तब्बल 10 रुग्णांचा करोना उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर नव्याने 183 जण संक्रमित आढळले. सद्यस्थितीला तालुक्यात 918 सक्रिय रुग्ण आहेत.

श्रीगोंदा शहरात 23 जण संक्रमित आढळले तर ग्रामीण भागात बेलवंडी बुद्रुक 11, आढळगाव 10, मढेवडगाव 10, काष्टी 7, घोटवी 7, हंगेवाडी 6, तांदळी दुमाला 6, येवती 5, एरंडोली 5, वांगदरी 5, देवदैठण 7, सुरेगाव 4, कणसेवाडी 4, चिंभळा 4, वेळू 4, घुटेवाडी 4, खरातवाडी 3, पिंप्री कोलंदर 3, वडघुल 3, चिखली 3 तर पिंपळगाव पिसा, लिंपणगाव, लोणी व्यंकनाथ, येळपणे, पारगाव सुद्रीक, ढोकराई, बेलवंडी कोठार, अधोरेवाडी, देऊळगाव व खांडगाव येथे प्रत्येकी 2 रुग्ण संक्रमित आले.

तर कोथूळ, बोरी, घारगाव, ढवळगाव, उखलगाव, पिसोरे बुद्रुक, श्रीगोंदा स्टेशन, हिरडगाव, बाबूर्डी,अजनुज, रुईखेल, वडाळी, घोडेगाव, श्रीगोंदा कारखाना, आनंदवाडी व कोंडेगव्हाण येथे प्रत्येकी 1 रुग्ण संक्रमित आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com