श्रीगोंदा कारखान्याविरोधातील ठिय्या आंदोलन मागे

खा. डॉ. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते यांची मध्यस्थी
श्रीगोंदा कारखान्याविरोधातील ठिय्या आंदोलन मागे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने 7 हजार 326 शेतकर्‍यांकडून भाग भांडवल आणि प्रवेश फी घेऊनही सभासद क्रमांक आणि भाग भाग दाखले देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकर्‍यांनी आज तहसिल कार्यालयात आंदोलन सुरू केले. मात्र खा. डॉ. सुजय विखे व आ. बबनराव पाचपुते यांनी मध्यस्थी केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर या शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले. आदोंलनात शेतकरी संदीप नागवडे,प्रशांत शिंदे, अनंता पवार, अंकुश नवले, खिवराज मचाले,प्रशांत मगर, हौसराव परकाळे सोमनाथ जाधव, बाळासाहेब पवार, सिद्धेश्वर नांद्रे, संजय मगर यांचा सहभाग होता.

आंदोलनाच्या स्थळी खा. सुजय विखे,आ. बबनराव पाचपुते, केशव मगर, जिजाबापू शिंदे, डॉ. दत्तात्रय नागवडे, सुवर्णा पाचपुते यांनी उपस्थित राहून शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या. खा. विखे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संबंधित शेतकर्‍यांचे आठ दिवसात आय रजिस्टर आणि जे रजिस्टर मध्ये नोंद करून त्याची खातर जमा करण्याची सूचना केली.आपण या सगळ्या बाबींचा पाठपुरावा करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ असे अश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com