‘श्रीगोंदा’च्या कार्यकारी संचालकांना मुदतवाढ देऊ नये

साखर कारखाना
साखर कारखाना

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना महाराष्ट्र शासनाकडून मुदतवाढ देऊ नये यासाठी कारखान्याचे सभासद भाऊसाहेब पवार यांनी उप सचिव साखर, मंत्रालय यांच्याकडे मागणी केली आहे.

कार्यकारी संचालक यांना एक वर्षासाठी दिलेली मुदतवाढ मागील महिन्यात संपली आहे. संचालक मंडळाने पुन्हा त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयास पाठवलेला आहे.पवार यांनी निदेवदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार 61 पेक्षा अधिक वय असणार्‍या कार्यकारी संचालकांना मुदतवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. नागवडे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी मागील एक वर्षात मागील गाळपात खोटी माहिती देऊन गाळप परवाना मिळवला होता.

एफआरपी बद्दलची चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती साखर आयुक्त यांना दिलेली होती. थकित हप्त्यासाठी श्री पवार यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कारखान्याची मळीची टाकी फुटल्यानंतर कारखान्याला गाळप परवाना करू नये, असे निर्देश दिले होते, तरीसुद्धा कार्यकारी संचालक यांनी तीन महिने गाळप करून तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. एमपीसीबी आणि पर्यावरणाचे नियम कार्यकारी संचालकांनी पाळले नाहीत. तसेच साखर पोते उत्पादनात खराब दाखवून शेतकर्‍यांचे आठ कोटी रुपयांचे नुकसान कार्यकारी संचालक यांनी केलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com