दौंड-मनमाड रेल्वे मार्गाखालचे बायपास रस्ते झाले जलमय

अनेक ठिकाणी रस्ते बंद
दौंड-मनमाड रेल्वे मार्गाखालचे बायपास रस्ते झाले जलमय

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

 दौंड ते मनमाड रेल्वे मार्गाला (Daund-Manmad railway line) क्रॉस करणारे रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) केलेले रेल्वेच्या खालचे पूल (Railway bridge) रस्ते पावसाने जलमय झाले असल्याने रस्त्याची वाहतूक ठप्प झाली असून या पुलाच्या खालचे पाणी ड्रेनेज करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केल्या नसल्याने तातडीने या रस्त्यावर साठलेले पाणी उपसा करून रस्ते खुले करण्याची मागणी गार गावचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत मगर यांनी केली आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गाखालचे बायपास रस्ते झाले जलमय
Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

रेल्वे विभागाने रेल्वे मार्गाला जिथे रस्ते क्रॉस (railway line cross) करतात अश्या ठिकाणी मागील काही वर्षांपासून रेल्वे रुळाच्या खाली रस्ते तयार केले. यात रेल्वेला जाण्यासाठी मार्ग सुकर झाला. तसा रेल्वे क्रॉस होताना वाहनांना थांबण्याचा वेळ वाचला असला तरी पावसाळ्यात चार महिने आणि पुढे जो पर्यंत पाणी कमी होत नाही तो पर्यंत नंतर पाणी जिरत नाही तो पर्यंत या पुलाच्या खाली खड्डा असल्याने इतर नागरी वाहतूक करण्यासाठी पाण्यातून वाहने किंवा नागरिकांना जाता येता येत नाही.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गाखालचे बायपास रस्ते झाले जलमय
कृषी विधेयकांची घाई थांबवा, अन्यथा आरपारची लढाई !

सध्या पावसाळ्यात या पूल खालच्या रस्त्यावर पाच ते दहा फूट पाणी साठले असल्याने बहुतांशी रस्ते बंद आहेत. निमगाव खलू दौंड महामार्गावर रस्त्याने जाण्यासाठी रेल्वे खालच्या पूल रस्त्यावर दहा फूट पाण्यात असल्याने भीमा नदीच्या (Bhima River) काठावर असलेल्या पंधरा ते वीस गावाना जाताना लांबच्या रस्त्याने जावे लागत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com