श्रीगोंदयात लिंबु खरेदी बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
सार्वमत

श्रीगोंदयात लिंबु खरेदी बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

Arvind Arkhade

श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा बाजार समिती तसेच तालुक्यातील लिंबू खरेदी काट्यांवर लिंबू खरेदी १२ जुलै पासून बंद करण्यात येत आहे. असे निवेदन दिले आहे. लिंबाचे बाजार अवघे तीन ते पाच रुपये असल्याने शेतकऱ्यांना लिंबू विक्री करून देखील योग्य मोबदला मिळत नाही.

व्यापारी यांनी पुढे इतर राज्यात लिंबू पाठवले तरी तिथे योग्य भाव नाहीत. करोनाच्या थैमान तसेच अन्य कारणे देऊन लिंबू खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शनिवारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या दालनात बैठक झाली मात्र यामध्ये तोडगा निघाला नाही.

Deshdoot
www.deshdoot.com