ओबीसी व मराठा आरक्षणासाठी भाजपाचा श्रीगोंद्यात चक्काजाम

ओबीसी व मराठा आरक्षणासाठी भाजपाचा श्रीगोंद्यात चक्काजाम

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

ओबीसी व मराठा समाजबांधवांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते (MLA Babanrao Pachpute) यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा (BJP Shrigonda) यांच्या वतीने आज सकाळी ११.०० वाजता दौंड जामखेड रोड, श्रीगोंदा (Jamkhed Road, Shrigonda) येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शांततेत निदर्शने व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. व आरक्षण जैसे थे न झाल्यास भविष्यात यापेक्षा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आ. बबनरावजी पाचपुते यांनी दिला.

ओबीसी व मराठा आरक्षणासाठी भाजपाचा श्रीगोंद्यात चक्काजाम
जेऊर हैबती येथील स्मशानभूीच्या जागेवरील 10 वर्षां पासूनचा वाद मिटविण्यात यश

यावेळी उपस्थीत आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. पाचपुते म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला “राज्य मागासवर्गीय आयोगाचे” गठन करावे व राज्यातील ओबीसी समाजाचा ‘Empirical Data’ जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा असा आदेश दिला. परंतु या आदेशाला १५ महिने होऊनही या सरकारने साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही. मुख्यमंत्री ठाकरे साहेबांस विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणीस साहेबांच्या तसेच भाजपा ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून पाच सहा वेळा पत्राद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. १२ डिसेंबर नंतरही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दहा ते बारा तारखा दिल्या. परंतु एकही तारखेला सरकारकडून कोणीही न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पुर्तता करून न्यायालयात हजर राहिले नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील प्रकरणात स्वतः लक्ष घातले नाही. हि अत्यंत गंभीर बाब आहे. मागासवर्ग आयोगाचे गठन न झाल्यामुळे ओबीसींना अरक्षणापासून मुकावे लागणार आहे, तसेच न्यायालयामध्ये मराठा समाजाची बाजू सक्षमपणे न मांडल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे. या दोन्हीही बाबतीत सरकार अपयशी ठरले आहे. सरकार घाईघाईने महाराष्ट्रामध्ये विविध खात्यामध्ये मेगा भरती घेऊन मराठा समाजाची फसवणूक करत आहे, तसेच विविध जिल्हापरिषदेमध्ये निवडणूक घेऊन ओबीसी समाजाचे नुकसान करत आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने याचा धिक्कार करत आहोत.

तहसीलदार पवार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनावेळी आ.बबनरावजी पाचपुते, दिनुकाका पंधरकर, पोपटआबा खेतमाळीस, दादाराम ढवाण, भैय्या लगड, शहाजी हिरवे, बाळासाहेब महाडिक, संतोष रायकर, संदिप नागवडे, राजेंद्र उकांडे, रमेश लाढाणे, बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, नवनाथ हिरवे, उमेश बोरुडे, दिपक शिंदे, विक्रम भोसले, सुहासिनी गांधी, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, अंबादास औटी, दिपक हिरनावळे, काका कदम, नितीन नलगे, दत्ता जगताप, दिलीप रासकर, आप्पा टकले, महेश क्षिरसागर, निखील सिदनकर, विद्या शिंदे, पुजा काळे, संध्या रसाळ, संगीता घोडेकर, हिराबाई गोरखे, स्मिता तरटे, अनुजा गायकवाड, रोहित गायकवाड, संकेत जंजिरे, प्रतीक बनकर यांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com