
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या ठिकाणी 16 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 जुगार्यांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या घटनेला काही कालावधी होण्याच्या अगोदर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी छापा टाकून 7 जुगार्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस पंचायत समितीच्या सदस्यांच्या पती सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी 16 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 जुगार्यांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या घटनेला काही कालावधी उलटतोय तोच पुन्हा भानगावात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप यांनी एक पथक तयार करून भानगाव या ठिकाणी छापा टाकला असता 27 सप्टेंबर रोजी भानगाव शिवारात, धनगरवस्तीजवळ एका पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना 7 जण आढळून आले.
जुगार खेळताना अनिल मधुकर लगड (वय 45, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदा), रवि गोविंद पाठक (वय 32, रा. वार्ड नं. 7 श्रीरामपूर), जावेद गुलाब बेपारी (वय 50, रा. खाटीक गल्ली श्रीगोंदा), आयूब महमद शेख (वय 50, रा. श्रीगोंदा), स्वप्निल प्रविण पितळे वय 25र्)े, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदा), वाळू आप्पा नवले (वय 37, रा. टाकळी कडेवळीत ता. श्रीगोंदा) सुरेश पंढरीनाथ गोरे (वय 46, रा. भानगाव ता. श्रीगोंदा), हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले आहेत.
त्यांच्याकडून 2 लाख 82 हजार 600 रुपयांची रक्कम मिळून आली. तसेच मोबाईल (41 हजार 500 रुपये) व चार मोटार सायकल (1 लाख 75 हजार रुपये) व तिरट नावाचे जुगार खेळण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.
भानगावमध्ये यापूर्वी टाकलेल्या छाप्यात देखील सुरेश पंढरीनाथ गोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा गोरे हे जुगार खेळताना आढळले. त्यांच्याच वरदहस्तकाखाली लाखो रुपये उलाढाल जुगार अड्ड्यावर होत असल्याची माहिती मिळाली.