Shrigonda
Shrigonda
सार्वमत

श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती भोइटे यांचा राजीनामा

एकत्र येत उपसभापतींच्या विरोधात अविश्वास ठरावाची तयारी

Nilesh Jadhav

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधीIShrigonda

श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग विठ्ठल भोइटे यांनी गेली साडेतीन वर्षांपासून नामधारी पद व सह्यांचे अधिकार नसल्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कार्यालयकडे दिला. आता अनेक दिवसांपासून उपसभापती वैभव पाचपुते यांच्या विरोधात असलेली खदखद बाहेर येऊन उपसभापती यांच्याच विरोधात एकत्र येऊन त्यांच्या विरोधात देखील अविश्वास ठराव येण्याची तयारीची ही सुरुवात असल्याची चर्चा आहे.

24 ऑक्टोबर 2016 रोजी श्रीगोंदा तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. निवडणुकीत जगताप, नाागवडे गटाचे 10 संचालक निवडून आले तर भाजपच्या आमदार बबनराव पाचपुते गटाचे आठ संचालक निवडून आले. आघाडीचे प्रवीणकुमार नाहाटा हे सभापती होते. त्यांनी राजीनामा दिल्यावर धनसिंग भोइटे सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून तर भाजपचे वैभव पाचपुते यांची निवड करण्यात आली.

नाहाटा यांची पंचायत समितीच्या निवडणुकीत हार झाल्याने व जामदार यांचे उपसभापतिपद गेल्याने अवघ्या पाचच महिन्यांत आघाडी धर्म सोडून वैभव पाचपुते यांच्याशी हातमिळवणी करत सभापती धनसिंग भोइटे यांचे सह्यांसह सर्व अधिकार काढून घेत नाममात्र सभापती ठेवले.

विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे गट यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदार पाचपुते यांना मदत केली. यावेळी नागवडेंचे खंदे समर्थक असलेले भोइटे यांना सह्यांचे व सर्व अधिकार देण्याचे ठरले होते. मात्र असे झाले नाही.

त्यात उपसभापती वैभव पाचपुते यांनी सगळा कारभार हातात घेतला. याबाबत इतर संचालक तक्रार करत असताना सभापती भोइटे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. आता उपसभापती पाचपुते यांच्या विरोधात बहुमताने अविश्वास ठराव दाखल होण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com