उसाच्या ट्रॅक्टरला धडकून तीन तरुणांचा मृत्यू

उसाच्या ट्रॅक्टरला धडकून तीन तरुणांचा मृत्यू

श्रीगोंदा | प्रतिनिधी

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून तीन तरुणांचा मृत्य झाला आहे. दौंड - पाटस रोडवर दि.१३ रोजी रात्री अपघात घडला.

मृतामध्ये ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ ), स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४), गणेश बापु शिंदे (वय २५) याचा समावेश आहे. तिघेही काष्टी बाजारतळ येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

ऊसाच्या ट्रकटर ट्रॉली मधून कारखान्याना होणारी वाहतूक दिवसेन दिवस धोकादायक होत असून मागील वर्षी अश्याच प्रकारे मागून जुगाडला धडकून एका तरुणांचा मृत्यू झाला होता. अश्या घटना रोजच घडत असताना ट्रॉलीला मागून रिफ्लेकटर लावलेली नसतात, प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करताना मोठ्या आवाजत लावलेली टेप रेकॉर्ड आणि धुंदीत ऊस वाहतूक करणारे ट्रकटर चालक यांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो अपघात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com