श्री विशाल गणपतीची उत्थापन पूजेनंतर नगरमध्ये मिरवणुकीला प्रारंभ

सनई -चोघडा, ढोल पथक सहभागी
छाया- राजू खरपुडे
छाया- राजू खरपुडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त आयोजित 'श्रीं'ची विधिवत उत्थापन पूजा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व सौ. मीनाक्षी सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर विसर्जना मिरवणुकीला शहरात सुरूवात झाली आहे. यावेळी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थान अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे आदी विस्वस्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

छाया- राजू खरपुडे
अश्लील गाणी वाजवण्यावरून दोन मंडळाचे कार्यकर्ते भिडले

मोरया...मोरया... गणपती बाप्पा मोरया"... "एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार"... "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणांनी परिसर दुमदुमूला आहे. भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. 

छाया- राजू खरपुडे
‘बाप्पा’ला निरोप देण्यासाठी नगरकर सज्ज !

मिरवणुकी च्या अग्रभागी सनई -चोघडा, दोन ढोल पथक सहभागी झाले होते. सजविलेले रथामध्ये विसर्जन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत होते.

छाया- राजू खरपुडे
अल्पवयीन मुलीला पळविले; पोलिसांनी २४ तासात शोधले
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com