श्री विशालचरणी सोन्याचा मोदक

श्री विशालचरणी सोन्याचा मोदक

अहमदनगर | प्रतिनिधी

कान्हूर पठार येथील गणेशभक्त दिनकर बाबाजी ठुबे यांनी सोन्याचा मोदक श्री विशाल गणेश चरणी अर्पण केला. अशा दानशुरांच्या योगदानामुळे मंदिराचा लौकिक वाढतच राहील, असे प्रतिपादन देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले.

श्री विशाल गणेश मंदिर हे पावन तिर्थक्षेत्र असून, जिल्ह्याबरोबरच राज्यातही अनेक भक्त परिवार आहे. हे भाविक नियमित श्री विशाल गणेशाच्या दर्शनासाठी येथे असतात. भाविकांची मोठी श्रद्धा या श्री विशाल गणेशावर असल्याने मंदिराच्या कार्यात ते योगदान देत असतात. या योगदानातून मंदिराचा भव्य, सुरेख असा जिर्णोद्धार झाला आहे. दिनकरराव ठबे यांची श्री विशाल गणेशावर मोठी श्रद्धा असल्याने त्यांनी सोन्याचा मोदकरुपी देणगी देऊन आपली भक्ती अर्पण केली आहे. असे अॅड. आगरकर म्हणाले.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पुजारी संगमनाथ महाराज, सीए सुनिल कुलट, अॅड. पाटील, आचार्य सर उपस्थित होते. यावेळी पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ठुबे परिवाराचा यावेळी देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

श्री विशाल गणेशावर आपली मोठी श्रद्धा असून, नित्यनियमाने आपण दर्शनासाठी येत असतो. श्री विशाल गणेशाच्या आशिर्वाद सदैव आपल्या पाठिशी असल्याने मंदिराच्या कार्यात आपलाही सहभाग असावा, या भावनेतून आपण श्री चरणी सोन्याचा मोदक अर्पण केला आहे.

दिनकर ठुबे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com